नागपूरNana Patole Jan Samvad Yatra - मराठा आरक्षणाचा गंभीर विषय हाताळण्यात भाजपाने सर्वात मोठी चुक केली आहे. सत्तेसाठी काहीपण ही भुमिकाचं आता भाजपाच्या अंगलट आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर येथे जन संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की बंजारा समाजाला आदिवासीत स्थान दिले जाईल. त्याचंबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. परंतु अद्याप ते आश्वासन पूर्ण केलं नाही. इतर समाजाचं आरक्षण कमी करून राज्याला मणिपूर करण्याचा डाव असल्याचा अतिशय गंभीर असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय.
वैयक्तिक जातीचं प्रमाणपत्र देता येत नाही- जर कुणाला कुठल्या जातीचं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्यांच्या कुळावर जावं लागते. जातीचे वैयक्तिक प्रमाणपत्र देता येणार नाही. त्यामुळेच आंदोलन सुरू झालय. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या गोष्टी जमत नाही, त्याचं आश्वासन भाजपाने द्यायला नको होतं. सध्याच्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर जातीनुसार जणगणना हाच पर्याय असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
ओबीसी आग आहे, नादाला लागू नका -ओबीसींना महाराष्ट्रात फक्त १९ टक्के आरक्षण आहे. गडचिरोलीत तर ओबीसी आरक्षणाची टक्केवारी ही केवळ २ टक्केचं आहे. मोदी सरकारनं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावूनही अजेंडा अद्याप ठरला नाही. यांना आरक्षणाची ५० टक्क्यांची मार्यादा सरकारला ओलांडायची नाही. ओबीसी आग आहे, त्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, हा आमचा इशारा आहे. ओबीसी समाजाला केवळ १९ टक्के आरक्षण मिळत आहे. राज्यात ओबीसीची संख्या ५६ टक्के आहे.