नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग स्फोटात सी-६० पथकाच्या १५ पोलीस जवानांना वीरमरण आले होते. या सर्व वीर जवानांना काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नाना पाटोलेंनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली. नक्षलवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा त्यांना यावेळी निषेधही केला आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
गडचिरोलीचा नक्षली हल्ला गंभीर बाब; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नाना पटोले - मुख्यमंत्री फडणवीस
रजागड लोह प्रकल्पाला सरकारच्या माध्यमातून लुटण्याचे काम केले जात आहे. येथील रॉयलटी हीचे नुकसान होत आहे. येथील लॉइडकडून भूसुरंगाचा वापर करूनच खनन केले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉईड व नक्षलवाद्यांचा परस्पर संबध आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे.

पटोले म्हणाले, सरकारच्या आशीर्वादानेचं गडचिरोली जिल्ह्यात खनिजसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात खनन होत आहे. सुरजागड येथील लोह प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगुन सुद्धा ते कानाडोळा करत आहेत. तसेच सुरजागड लोह प्रकल्पाला सरकारच्या माध्यमातून लुटण्याचे काम केले जात आहे. येथील रॉयलटी हीचे नुकसान होत आहे. येथील लॉइडकडून भूसुरंगाचा वापर करूनच खनन केले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉईड व नक्षलवाद्यांचा परस्पर संबध आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पटोलेनी केला.
तसेच नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोलेेंनी केली आहे.