महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना परिस्थितीमुळे नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारोह रद्द - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर

११ एप्रिल रोजी आयोजित विशेष दीक्षांत समारोह आणि २३ एप्रिल रोजी १०८ वा दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. विशेष दीक्षांत समारोहात देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना एलएलडी या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र नागपूरसह संपूर्ण विदर्भातच कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने दोन्ही कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

By

Published : Apr 9, 2021, 4:13 PM IST

नागपूर - कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दोन्ही दीक्षांत समारोह पुढे ढकलण्यात आले आहेत. ११ एप्रिल रोजी आयोजित विशेष दीक्षांत समारोह आणि २३ एप्रिल रोजी १०८ वा दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. विशेष दीक्षांत समारोहात देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना एलएलडी या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र नागपूरसह संपूर्ण विदर्भातच कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने दोन्ही कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कायद्याचे शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. आज देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम करत आहेत. न्यायदानाच्या क्षेत्रात सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे योगदान अतुलनीय असल्याने नागपूर विद्यापीठाणे त्यांना एलएलडी या मानद पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कार्यालयाकडून ३ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. या समारोहाला राष्ट्रपती आणि राज्यपाल महोदयांना आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ मिळू न शकल्याने राज्यपालांच्या उपस्थित ११ एप्रिल रोजी विशेष दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. मात्र नागपूरसह विदर्भातीत कोरोनाचा उद्रेक झाला असल्यामुळे आणि कार्यक्रमांना परवानगी मिळणार नासल्याने दोन्ही दीक्षांत समारोह अनिश्चित काळाकरिता पुढे ढकलण्यात आले आहेत.

ऑनलाइन कार्यक्रमाचा पर्याय उपलब्ध

कोरोनामुळे दोन्ही दीक्षांत समारोह लांबणीवर पडले असले तरी येत्या काळात ऑनलाइन पद्धतीने हे समारोह आयोजित केले जाऊ शकतात, त्या दृष्टीने विचार सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details