महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime: पानठेला चालकावर गोळीबार करून फरार झालेल्यांपैकी दोघांच्या आवळल्या मुसक्या - गोळीबार प्रकरणातील दोघांना अटक

नागपूर शहरातील मोमीनपुरा भागात मागील काही दिवसांपूर्वी कारची धडक लागल्याने उद्‌भवलेल्या वादातून पानठेला चालकाला भयभीत करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या प्रकरणात तहसील पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आनंद सुरेश ठाकुर (२८) आणि रवि शांताराम लांजेवार (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Nagpur Crime
दोघांच्या आवळल्या मुसक्या

By

Published : Mar 25, 2023, 7:32 PM IST

पोलीस आयुक्त गुन्हे प्रकरणाविषयी माहिती देताना

नागपूर:तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदरी रोड मोमीनपुरा येथे राहणारे फिर्यादी नईम अक्तर अब्दुल अलीम अंसारी यांचा मदिना कॉम्प्लेक्स मोमीनपुरा येथे नईम पान शॉप नावाने पानठेला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पानठेल्यावर असताना पानठेल्या समोर मोहम्मद सहाबुद्दीन हा दुचाकी गाडीवर बसून चहा पीत होता. यावेळी एका निळ्या रंगाच्या कारने मोहम्मद सहाबुद्दीन यांच्या गाडीला धडक दिली. यानंतर कारमधील तीन ते चार लोकांसोबत सहाबुद्दीन यांचा वाद झाला. त्यावेळी सहाबुद्दीन यांनी गाडी चालकाला कानशिलात मारली. प्रकरण वाढू नये यासाठी आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्ती करत वाद सोडवला.


ते परत आले आणि केला गोळीबार: त्यानंतर दोन्ही पक्ष आपल्या मार्गाने निघून गेले. फिर्यादी नईम अक्तर अब्दुल अलीम अंसारी हे त्यांच्या पानठेल्याची साफसफाई करीत असताना निळी कार परत आली. तीन ते चार इसम दुपट्टयाने तोंड बांधून होते. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीने पिस्टल बाहेर काढत हवेत गोळीबार केला. त्यानंतर दुसरी गोळी फिर्यादीच्या दिशेने त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने झाडली; मात्र फिर्यादी खाली बसल्याने त्याना गोळी न लागता पानठेल्याला लागली. त्यानंतर आरोपी हे गाडीसह पळून गेले.


दोन आरोपींना अटक: याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसील येथे आरोपींच्या विरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आनंद सुरेश ठाकुर आणि रवि शांताराम लांजेवार यांना अटक केली आहे.

कामठीमध्ये झाला होता गोळीबार:नागपुरात यापूर्वीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे, कामठी येथील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका फार्म हाऊसवर काही बंदूकधारी दरोडेखोरांनी 3 फेब्रुवारी, 2022 रोजी हल्ला केला होता. लुटपाट आणि दहशत माजवण्यासाठी दरोडेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने या घटनेत फार्म हाऊसमधील कुणालाही दुखापत झाली नाही. काही वेळाने दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला होता.

फार्म हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न: नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर-जबलपूर महामार्गावरील आवंडी गावापासून एक किमी अंतरावर यशपाल शर्मा, या व्यक्तीचे शेतात घर होते. ते फार्म हाऊसमध्ये एकटे राहतात. त्यामुळे आजूबाजूला शेतात काम करणारे मजूरही काम आटोपल्यानंतर त्यांच्याच फार्म हाऊसमध्ये मुक्काम करतात. रात्री उशिरा आठ ते दहा बंदूकधारी दरोडेखोर चेहरा झाकून त्यांच्या शेतात शिरले होते. यशपाल शर्मा यांच्या फार्म हाऊस बाहेर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून फार्म हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही.

हेही वाचा:Indian Prisoners In Foreign Jails: परदेशातील तुरुंगांमध्ये 56% पेक्षा जास्त भारतीय कैदी आखाती देशांमध्ये ;लोकसभेत माहिती उघड

ABOUT THE AUTHOR

...view details