महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरपुत्र भूषण सतई यांना वीरमरण; नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या संवेदना - नागपूर शहीद जवान बातमी

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूरचे जवान सुपुत्र भूषण सतई यांना वीरमरण आले आहे.

nagpur-son-bhushan-satai-dies-in-pakistan-attack-in-uri-sector
नागपूरपुत्र भूषण सतई यांना वीरमरण; नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या संवेदना

By

Published : Nov 14, 2020, 3:47 PM IST

नागपूर -काल पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथे राहणारे सुपुत्र भूषण सतई या जवानाला वीरमरण आले आहे. ही बातमी नागपूर जिल्ह्यात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनीदेखील भूषण सतई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी सदैव राहील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

नितीन राऊत यांची प्रतिक्रिया
भूषण सतई हे मराठा रेजिमेंटचे जवान होते. ते श्रीनगरमधील उरीच्या गुरेज सेक्टरमध्ये कार्यरत असताना काल पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये त्यांना वीरमरण आले. शिवाय काही सामान्य नागरिकांचा देखील यामध्ये मृत्यू झाला. भूषण यांचे पार्थिव आज रात्री नागपूरला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

काल झाले शस्त्रसंधीचे उल्लंघन-

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवार जम्मू काश्मीरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये शहीद झाले. भारतानेदेखील प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा- आरबीआयकडून पंजाब नॅशनल बँकेला दणका; 1 कोटी रुपयांचा ठोठावला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details