नागपूर :महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते लोकार्पण होणार ((Samriddhi Highway Inauguration) आहे. या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा (Nagpur ready for PM Narendra Modi program) घेतला.
आयोजनाचा आढावा :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एम्स येथे एकाच वेळी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत. या ठिकाणच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ही उपस्थित राहणार असून या ठिकाणच्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्या दरम्यान ते वंदे मातरम एक्सप्रेसचा शुभारंभ, मेट्रोचा शुभारंभ, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, चंद्रपूर येथील सिपेट कॉलेजच्या इमारतीचा शुभारंभ, एम्समधील विद्यार्थ्यांची भेट,अनेक उपक्रमांचा शुभारंभ असे कार्यक्रमांचे स्वरूप (Samriddhi Highway Inauguration PM Narendra Modi) आहे.