नागपूर : Nagpur Rape Case : महाविद्यालयातील तरुणीचा पाठलाग करत एका अज्ञात आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवारी (5 ऑक्टोबर) उघडकीस आली आहे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर ही घटना घडली (Nagpur Rape case) आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला घडली होती. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप केला जात आहे. घटना घडल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तत्परता दाखविल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हालवली. घटनास्थळी सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे यांनी भेट दिल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती आली.
तरुणीचा करायाचा पाठलाग : वर्धा येथील एक तरुणी ४ ऑक्टोबर रोजी गावावरून महाविद्यालयाच्या परिसरात उतरली. ती बॅग घेऊन वसतिगृहमध्ये जात होती. यावेळी एका अज्ञात आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ तो तिच्या मागावर होता.
बहिणीला दिली माहिती, पण अनर्थ घडला :आरोपी पाठलाग करत असल्याने धास्तवलेल्या तरुणीने आपल्या मोठया बहिणीला फोनवरून याबाबतची माहिती दिली. पीडित तरुणीच्या बहिणीने महाविद्यालय प्रशासनाला ही बाब कळवली. मात्र, तोपर्यंत अज्ञात आरोपीने पीडित तरूणीवर अतिप्रसंग केला. बहिणीने फोन केल्यानंतर लगेचचं महाविद्यालयतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने हिंगणा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले होते. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिसात (Hingna Police Station) करण्यात आली.