महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Rain : नागपुरात पावसाचा हाहाकार; शाळांना सुट्टी जाहीर, भारतीय सैन्याकडून मदतकार्य - rain in nagpur today

Nagpur Rain : शनिवारी (23 सप्टेंबर) पहाटे नागपुरात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळं नागपूर शहरात अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं होतं. पावसामुळं नागपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 8:31 AM IST

Updated : Sep 23, 2023, 1:29 PM IST

नागपुरात मुसळधार पाऊस

नागपूर : Nagpur Rain : अवघ्या ४ तासात नागपुरात पावसाचा अक्षरशः हाहाकार अनुभवायला मिळाला. प्रादेशिक वेधशाळेच्या माहितीनुसार, ४ तासाच्या कालावधीत नागपुरात तब्बल १०६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रात्री दोन वाजता शहरात मुसळधार पावसाला (Flood in Nagpur) सुरुवात झाली होती. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत १०६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद (Nagpur Weather) झाली आहे. पारडी परिसरातील नेताजी नगर मागील बाजूला गौरी नगरमध्ये ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी भरल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात शनिवारी पहाटे मुसळधार पावसामुळं अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं काही भागात पाणी शिरलंय. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून, तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीनं मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम बचावकार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्यानं प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

अनेक घरांमध्ये शिरलं पाणी :मुसळधार पावसामुळं शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. काही भागात घरांमध्ये पाणी शिरलंय. यामध्ये वर्धमान नगर, शांती नगर, पारडी, भरतवाडा, शिवशंभू नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, सूर्या नगर, एच.बी. टाऊन इत्यादी भागांचा समावेश आहे. तर अनेक सकल भागात पाणी साचल्यानं घरांमध्ये पाणी गेलंय. त्यामुळं नागपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय.

शाळांना सुट्टी जाहीर : अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्यानं नागपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळं आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलीयं.

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो : नागपुरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. रात्री पावसाची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळं अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय. तलावातील पाणी प्रथम रस्त्यावर आणि नंतर रस्त्यालगतच्या अंबाझरी लेआऊटमधील घरात शिरलंय. महापालिकेचे सुमारे ४० अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, वस्त्यांमधील पाणी काढण्याचं काम सुरुयं.

वृद्ध नागरिकांना सुखरुप स्थळी हलवलं : जोरदार पावसामुळं सकल भागाशिवाय शहरात जागोजागी पाणी भरल्याच्या तक्रारी आहेत. पाणी साचल्यामुळं अनेक वृद्ध नागरिक अडकून पडले होते. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं नागपुरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. सध्या पाऊस थांबलेला असला तरी अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं शहरात एनडीआरएफचे एक आणि एसडीआरएफच्या दोन टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय सैन्याकडून बचावकार्य सुरू : अंबाझरी परिसरात भारतीय सैन्याकडून बचावकार्य सुरू आहे. सकाळी जेव्हा आम्हाला मेसेज मिळाला तेव्हा पाणी जास्ती होतं. पाण्यात अनेक नागरिक अडकले होते. माहिती मिळताच आम्ही एक बोट आणली अन् नागरिकांची सुखरुप सुटका केली. तसेच त्यांना पिण्याचं पाणी आणि बिस्किटं दिली. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्यानं दिली.

बोटीच्या मदतीनं मदतकार्य : नागपूर शहरातून जाणारे नदी आणि नाले तुडूंब भरून वाहत असल्यानं अनेक भागात रस्त्यांवर पाणी आलंय. त्यामुळं रस्त्यांवर अक्षरशः बचाव पथकांना नाव चालवावी लागली आहे. तर हजारी पहाड या भागात गोठ्यातील काही जनावरे दगावले आहेत. या शिवाय सीताबर्डी परिसरातील मोरभवन सिटीबस स्टॅण्डमध्ये १४ प्रवासी अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. Water Shortage in Heavy Rain : मुसळधार पावसातही पाणीटंचाई; अमरावतीच्या मेळघाटातील भीषण वास्तव
  2. Nashik Rain : गोदावरीची पाणी पातळी वाढली; छोटे पूल, मंदिरे पुराच्या पाण्याखाली
  3. Maharashtra Weather Update : कोकणाला 'यलो अलर्ट' तर उर्वरित महाराष्ट्र तहानलेलाच, जाणून घ्या राज्यातील पावसाचा 'हालहवाल'
Last Updated : Sep 23, 2023, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details