महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फक्त गाढवालाच नियम माहीत नसतात... विनाकारण फिरणाऱ्यांना नागपूर पोलिसांचा झटका

नागपूर वाहतूक पोलिसांनी आता कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांच्या हातात "मी मनुष्य प्राणी आहे, फक्त मला शिंगे फुटलेली नाही", "फक्त गाढवालाच नियम माहीत नसतात", "माझा मेंदूच लॉकडाऊन झाला आहे", "मी समाजाचा दुश्मन आहे, कारण मी नियम पाळत नाही" अशा आशयाचे पोस्टर्स देऊन त्यांचे फोटो काढणे आणि ते सोशल मिडीयावर व्हायरल करणे सुरु केले आहे.

नागपूर वाहतूक पोलिसांची अशीही गांधीगिरी
नागपूर वाहतूक पोलिसांची अशीही गांधीगिरी

By

Published : Mar 27, 2020, 9:30 AM IST

नागपूर - कोरोना सारख्या जीवघेण्या वायरस पासून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे रक्षण करायचे असेल तर, लॉकडाऊन दरम्यान घरी बसा बाहेर फिरू नका, कोरोनाला गांभीर्याने घ्या. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनी वारंवार सांगितल्यानंतरही काही बेजबाबदार नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. घरी सुरक्षित न बसता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागपूरकरांना आता उपहासात्माक शब्दात स्वत:च्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

नागपूर वाहतूक पोलिसांनी आता कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांच्या हातात "मी मनुष्य प्राणी आहे, फक्त मला शिंगे फुटलेली नाहीत", "फक्त गाढवालाच नियम माहीत नसतात", "माझा मेंदूच लॉकडाऊन झाला आहे", "मी समाजाचा दुश्मन आहे, कारण मी नियम पाळत नाही" अशा आशयाचे पोस्टर्स देऊन त्यांचे फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करणे सुरू केले आहे.

नागपूरच्या सीताबर्डी परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी अनेक वाहनचालकांना करणाशिवाय बाहेर फिरताना पकडले. त्यांच्या हातात अपमानाची जाणीव व्हावी असे पोस्टर्स देऊन किमान आता तरी कारणाशिवाय बाहेर पडू नका, अशी विनंती केली. पोलिसांच्या या जालीम उपायानंतर तरी नागपूरकर सुधारतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details