नागपूर- मकरसंक्रांतीचे औचित्य साधून नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला आणि कडू बोलणाऱ्यांची माहिती आम्हाला द्या, अशा आशयाचे ट्वीट नागपूर पोलिसांनी केलं आहे. त्यानंतर हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नागपूर पोलिसांकडून हटके ट्विट.. मकरसंक्रांतीच्या भन्नाट शुभेच्छा - नागपूर पोलीस बातमी
नागपूर पोलिसांनी मक्रर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एक मोबाईल नंबरही शेअर केला आहे.
हेही वाचा - फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या चालकाला १० हजारांचा दंड, नंबर प्लेट पाहून तुम्हीही व्हाल थक्क
नागपूर पोलिसांनी मक्रर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एक मोबाईल नंबरही शेअर केला आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला... असे म्हणत, जर कोणी कडू बोलत असेल आणि वागत असेल तर आम्हाला कळवा असंही नागपूर शहर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन म्हटले आहे. नागपूर पोलिसांच्या या ट्विटला काही भन्नाट रिप्लाय आले आहेत. त्यातील रिप्लाय नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील.