प्रतिक्रिया देताना शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार नागपूर :होळी रंगपंचमीच्या उत्सवात नशाखोरी मोठ्या प्रमाणात होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात ड्रग्स आणि इतर अमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची माहिती एनडीपीएस विभागाला समजली होती. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे रात्री सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ सापळा रचून कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी कुणाल गोविंद गभणे आणि गौरव संजय कालेश्वरराव यांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्या गाडीची पंचासमक्ष झडती घेतली.
आरोपींना अटक : झडती घेतल्यानंतर गाडीतुन एकुण 4 झिपलॉक पॉकेटमध्ये एकुण 1 किलो 911 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्स पावडर आढळून आले आहे. त्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. पोलिसांनी 39/2023 कलम 8 (क), 22 (क), 29 एन.डी.पी.एस. ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट अंतर्गत कारवाई :नागपूर शहरात गांजा, ड्रग्स, चरस आणि ब्राऊन शुगरच्या वाढत्या विक्रीमुळे पोलिसांची चिंता वाढली होती. मात्र ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट मोहीमेमुळे शहरात अमली पदार्थ तस्करीच्या घटनांना आळा बसल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले आहेत. शहरात अमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणारे आरोपी आपले जाळे तयार करत असल्याने त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न सुरू केले होते. युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाची समस्या ही नागपूरात दिवसें-दिवस मोठया प्रमाणात वाढत आहे.
पोलीस काका ठरले प्रभावी :वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे. पोलीस काकांच्या मदतीने नागपूर शहरातील विविध शाळा, कॉलेज, स्लमवस्तीत जावून जनतेमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परीणाम सांगितले जात आहेत. सुरवातीला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत १३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
हेही वाचा : Buldhana Police Action: कॅफेमध्ये 'केबिन सुविधा'; अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर पोलिसांची कारवाई