महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur police seized ganja : नागपूर पोलिसांनी पकडला हजार किलो गांजा, ट्रक चालक आणि कंडक्टर ताब्यात

नागपूर शहर पोलिसांनी, १०० बॅग असलेला गांजाने भरलेला ट्रक (Nagpur police seized 1000 kg of ganja) पकडलेला आहे. पोलिसांनी भंडारा मार्गावर हा ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रक चालक आणि कंडक्टरला ताब्यात (Truck driver and conductor detained) घेतले असून; पुढील कारवाई सुरू आहे.

Nagpur police seized ganja
नागपूर पोलिसांनी पकडला हजार किलो गांजा

By

Published : Nov 16, 2022, 12:32 PM IST

Updated : Nov 16, 2022, 2:34 PM IST

नागपूर : नागपूर शहर पोलिसांनी गांजाने भरलेला ट्रक पकडलेला आहे. ट्रकमध्ये १०० बॅग गांजा (Nagpur police seized 1000 kg of ganja) असून; त्याचे वजन अंदाजे एक ते दीड हजार किलो असल्याची माहिती पुढे आलेली आहे. ट्रकमध्ये गांजा कुठून आला आणि कुठे जात होता? यासंदर्भात तपास सुरू आहे. पोलिसांनी भंडारा मार्गावर हा ट्रक पकडला असून; कारवाई सुरू आहे.

प्रतिक्रिया देतांना नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत आज सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी शहराच्या सीमेवर केली आहे. सेंद्रिय खतांनी भरलेल्या ट्रक मधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची, गुप्त माहिती नागपूर पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून ट्रक पकडला आहे. ट्रकची झडती घेण्यात आली तेव्हा, ट्रकमध्ये तब्बल 1 ते दीड हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक आणि कंडक्टरला ताब्यात (Truck driver and conductor detained) घेतले आहे. गेल्या 48 तासापासून नागपूर पोलिसांचे पथक या ट्रकच्या शोधात होते.

Nagpur police seized ganja




नागपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आज पहाटे नागपूरच्या कापसी परिसरातुन गांजाने भरलेला एक ट्रक जाणार आहे. ओडिसामधून हा ट्रक निघाला असून; त्यामध्ये सेंद्रिय खतांच्या बॅग्स मध्ये गांजा भरलेला असल्याची माहिती देखील पोलिसांना समजली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांच्या विशेष प्रशिक्षित केनाईन डॉगच्या मदतीने ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ट्रकमध्ये तब्बल एक हजार ते दीड हजार किलो वजनाचा गांजा आढळून आला.

Nagpur police seized ganja

ओडिसा मधून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे. नागपूर पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क केल्यानंतर बीडमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 1000 किलो गांजा बीड मधून इतरत्र जिल्ह्यात पाठवला जाणार होता, अशी देखील माहिती पुढे आली असून; पोलिसांनी गांजा पाठवणाऱ्याला देखील अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Last Updated : Nov 16, 2022, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details