नागपूर- दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ नगरमध्ये साहिल प्रमोद तांबे (19) या तरूणाचा खून झाला होता. त्यानंतर साहिलचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा तपास करत अजनी पोलिसांनी सुमित पिंगळे नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
24 तासात साहिलच्या हत्येचा उलगडा, जुन्या वादातून खून - धमकी
साहिलचे वडील प्रमोद तांबे आणि आरोपी सुमित यांच्यात जुना वाद होता. त्यातूनच साहिलची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित हा कुख्यात गुंड असून त्याने 3 वर्षांपूर्वी मृत साहिलचे वडील प्रकाश तांबे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली होती. सुमितने आपल्या वडिलांवर हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजल्यानंतर साहिल हा सुमितच्या घरी गेला. त्यावेळी साहिलने सुमितच्या आईजवळ साहिलने माझ्या वडिलांचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे, मी देखील साहिलच्या वडिलांचा गेम करेल, अशी धमकी दिली होती.
त्यानंतर ही गोष्ट सुमितच्या आईने कारागृहात जाऊन सुमितला सांगितली. काही महिन्यांपूर्वी सुमितची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर तो साहिलच्या मागावर होता. 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेला त्याला साहिल एकटा भेटला असता आरोपी सुमितने मित्रांच्या मदतीने साहिलचा खून करून त्याचा मृतदेह सिद्धार्थनगरच्या मैदानात फेकून दिला. त्याने हात पाय बांधून गळा आवळून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.