नागपूर - लॉकडाऊनच्या काळात पोलीस 24 तास आपले कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना कधी दंडुक्यांनी तर कधी हात जोडून समजावून त्यांना घरी राहण्याची विनंती करत आहेत. या संकटाच्या काळातही नागपूर पोलिसांनी नागरिकांना शक्य तितके सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन काळात वाढदिवस असल्याने एका तरुणाला केक आणता आला नाही. त्याने पोलिसांना परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आणि काही वेळातच त्या मुलाला त्याच्या घरी जाऊन वाढदिवसाचा केक दिला.
लॉकडाऊनमध्ये वाढदिवस असणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांचे सरप्राईज!
नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पोलिसांना पराग या तरुणाचा फोन आला. माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का? अशी विचारणा त्याने केली. पोलिसांनी त्याला नकार दिला. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी पराग निराश होऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क त्याच्या घरी केक नेऊन त्याला सरप्राईज दिले.
पोलीस
नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पोलिसांना पराग या तरुणाचा फोन आला. माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का? अशी विचारणा त्याने केली. पोलिसांनी त्याला नकार दिला. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी पराग निराश होऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क त्याच्या घरी केक नेऊन त्याला सरप्राईज दिले. पोलिसांच्या या सरप्राईजमुळे परागला सुखद धक्का बसला. पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Last Updated : Apr 22, 2020, 9:00 AM IST