नागपूर- दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. अनैतिक संबंधांची माहिती आत्याने भाचीच्या पतीला दिल्याच्या रागातून भाच्चीने प्रियकराच्या मदतीने आत्यासह दोघांची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात रामटेक पोलिसांनी आरोपी भाची रितू बागबांदे आणि तिचा प्रियकर महेश भय्यालाल नागपूरे यांना अटक केली आहे. याशिवाय आणखी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयवंता भगत आणि संदीप मिश्रा असे मृतकांचे नावं आहेत. संदीप हा जयवंताचा मानलेला भाऊ होता.
सहा वर्षांपासून जयवंता आणि संदीप हे दोघेही रामटेकमधील एका शेतात काम करायचे आणि कुटुंबासह शेतातच राहात होते. दोन महिन्यांपूर्वी जयवंता भगत यांची भाची रितू रामटेकला आली. त्याच्या मागोमाग तिचा प्रियकर महेश हा देखील रामटेकला आला. ते दोघेही दुसऱ्या शेतात काम करायचे. या दरम्यान जयवंता यांना रितू आणि महेश यांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली होती. त्यांनी याची माहिती रितूच्या पतीला दिली. पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती समजताच रितूच्या पतीने रामटेक येथे जाऊन तिच्या सोबत वाद घातला आणि तिला घेऊन निघून गेला. दोन दिवसांपूर्वी आरोपी रितू आणि महेश दोन अल्पवयीन साथीदारांना घेऊन कारने रामटेकला आले. त्यांनी संदीप व जयवंता या दोघांना बळजबरीने कारमध्ये बसविले. काही अंतरावर नेऊन महेशने कुऱ्हाडीने वार करून संदीप यांचा खून केला.
जयवंताचा मृतदेह भंडाऱ्यात आढळला -