नागपूर - यवतमाळमध्ये गुटखा विक्रेत्याकडून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची घटना घडल्यानंतर नागपुरात छुप्या पद्धतीने गुटखा विकणारे आणि खाणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नागपूरच्या क्वार्टर आणि ताजबाग परिसरात लॉकडाऊन असतानाही काही गुटखा विक्रेते घरीच गुटखा तयार करून छुप्या पद्धतीने विक्री करत होते. पोलिसांनी गेल्या तीन दिवसात या भागात पाच विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून साहित्यासह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
छुप्या मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - नागपूर गुन्हेवार्ता
नागपूरच्या क्वार्टर आणि ताजबाग परिसरात लॉकडाऊन असतानाही काही गुटखा विक्रेते घरीच गुटखा तयार करून छुप्या पद्धतीने विक्री करत होते.

छुप्या मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
छुप्या मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
नागपूरसह विदर्भात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व आस्थापने बंद आहेत. त्यात पानठेलेसुद्धा बंद आहेत. मात्र, लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पानठेला चालकांनी छुप्या मार्गाने गुटखा तयार केल्यानंतर तो विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एवढेच काय तर गुटख्याची होम डिलिव्हरी देणेसुद्धा सुरू केली आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.