महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुख्यात गुंड बादलची हत्या; 12 तासाच्या आत 5 आरोपी जेरबंद - आरोपी

कुख्यात गुंड बादल गजभिये यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

कुख्यात गुंड बादलची हत्या; 12 तासाच्या आत 5 आरोपी जेरबंद

By

Published : Apr 25, 2019, 11:38 PM IST

नागपूर- शहरात बुधवारी रात्री कुख्यात गुंड बादल गजभिये याची तीक्ष्ण हत्यार आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी 12 तासाच्या आत छडा लावत आरोपीना अटक केली आहे. बादलची हत्या कौटुंबिक कारणातून झाली असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताच्या भावाच्या मेव्हणासह 5 आरोपीला अटक केली आहे.

बादल गजभिये हत्या प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी


नागपूरच्या गुन्हेगारी जगतात मोठे नाव बनवू पाहणाऱ्या बादल नावाच्या गुंडांची बैधनाथ चौकात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हत्या झाली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.


हत्येचे हे आहे कारण -
मृत आणि आरोपी शेजारीच राहायचे. मृताच्या भावाची पत्नी ही मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची बहीण होती. बादल हा त्याचा बहिणीला त्रास देत होता. त्यांच्यांत घरगुती भांडण होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यामुळे त्याने बादलला मारण्याचा 'प्लान' आखला. त्या प्लॅननुसार त्याने साथीदारच्या मदतीने बादलची हत्या केली.


बादल हा रात्री फिरायला बैधनाथ चौकात आला. त्याच्या मागावर त्याच्या सख्या भावाचा मेव्हाणा आला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्रसुद्धा होते. याच्यापैकी एकाने बादलच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि राहिलेल्या सगळ्यांनी तीक्ष्ण शस्त्र आणि दगडाने ठेचून बादलची हत्या केली. हत्या केल्यानंतर सगळे आरोपी फरार झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details