महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॉक रायडर सायकलिंग ग्रुपची इको फ्रेंडली दिवाळी साजरी; नागपूरकरांनी केले स्वागत - नागपूर दिवाळी न्यूज

प्रत्येक दिवाळीत प्रदूषणात वाढ नोंदवली जाते. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाकडून फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. त्यामुळे आता अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या संदर्भात महत्त्व पटवून देण्यासाठी नागपूरातील हॉक रायडर सायकलिंग ग्रुपकडून प्रयत्न केले जात आहेत.

नागपूर हॉक रायडर सायकलिंग ग्रुप न्यूज
नागपूर हॉक रायडर सायकलिंग ग्रुप न्यूज

By

Published : Nov 18, 2020, 2:52 PM IST

Updated : Nov 18, 2020, 3:00 PM IST

नागपूर - हॉक रायडर सायकलिंग ग्रुपकडून नागपूरात आगळी-वेगळी आणि पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी सर्व रायडरने आपल्या सायकलच्या चाकांना एलईडी लायटिंग लावली होती. त्यानंतर सर्व सायकल रायडर्सनी संपूर्ण शहरभर फिरून जनजागृती केली. त्यांच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती समन्वयक अजय बनसोडे यांनी दिली.

हॉक रायडर सायकलिंग ग्रुपची इको फ्रेंडली दिवाळी साजरी

हेही वाचा -माझ्या भावाचा बदला भारताने घेतलाच पाहिजे; हुतात्मा जवान भूषण यांच्या बहिणीची मागणी

प्रत्येक दिवाळीत प्रदूषणात वाढ नोंदवली जाते. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाकडून फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. त्यामुळे आता अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या संदर्भात महत्त्व पटवून देण्यासाठी नागपूरातील हॉक रायडर सायकलिंग ग्रुपकडून प्रयत्न केले जात आहेत.

या दिवाळीचे औचित्य साधून या सायकलिंग ग्रुपने आगळी-वेगळी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून हॉक रायडर सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या सायकलच्या चाकांना एलईडी लाईट्स लावून शहरभर भ्रमंती केली. शिवाय सायकलिंगचे महत्त्व देखील या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागपूरकर जनतेने स्वागत केले आहे.

हेही वाचा -वीर जवान भूषण सतई अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Last Updated : Nov 18, 2020, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details