नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाईल बंद करुन दिवे किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावावा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटवले. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅश लाईट लावले. त्यामुळे नागपूर दिव्यांनी उजळली होती.
नागपुरात पेटविले घरोघरी दिवे.. हेही वाचा-कोरोना संकट: मनमोहन सिंग, सोनिया, प्रणव मुखर्जींसह 'या' नेत्यांशी पंतप्रधानांनी केली चर्चा
अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याच्या तेजोमय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी रविवारी नागपुरात बहुसंख्य नागरिकांनी घरासमोर दिवे लावून कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान दिले आहे. सोशल डिस्टनिंगच्या नियमांचे पालन करत नागपुरातील नागरिकांनी दिवे पेटवले.
हजारो नागरिकांनी आपल्या घरासमोर दिवाळी प्रमाणेच दीपोत्सव साजरा केला. तर नागपुरातील प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरात ५०० दिवे लावण्यात आले. त्यामुळे संपूर्ण राम मंदिर दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाले होते.
दरम्यान, रविवारी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता. मला तुमचे नऊ मिनिट हवे आहेत. घरातल्या सगळ्या लाईट बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावून दरवाजात किंवा बाल्कनीत उभे रहा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. कोरोना रुग्णांसाठी जीवाची पर्वा न करता सेवा देत असलेले डाॅक्टर, पोलीस यांना धन्यवाद करण्यासाठी दिवा असे मोदींनी सांगितले होते.