नागपूर -शहरातील संत्रा मार्केटमधील दुकानांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
नागपुरात संत्रा मार्केटला आग, १३ दुकानातील संत्र्याच्या पेट्या जळाल्या - नागपूर संत्रा मार्केट
सध्या संत्र्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने संत्रा फळांनी सजलेली आहेत. लाकडी आणि पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये संत्री ठेवली जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या बाजारपेठेमध्ये अचानक आग लागली. यामध्ये १३ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

सध्या संत्र्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने संत्रा फळांनी सजलेली आहे. लाकडी आणि पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये संत्री ठेवली जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या या बाजारपेठेमध्ये अचानक आग लागली. यामध्ये १३ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तसेच संत्र्याच्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी ११ अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझवण्यात आली. यामध्ये संत्री ठेवलेल्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.