महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा, नागपूरच्या फ्रेंड्स शोरूममधील धक्कादायक प्रकार - नागपूर news

नागपूरच्या सीताबर्डी भागातील फ्रेंड्स या कपड्यांच्या शोरूममध्ये चेंजिंग रूममध्ये लपवलेल्या मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दुकान मालक आणि नोकरास अटक करण्यात आली आहे.

महिला चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा, नागपूरच्या फ्रेंड्स शोरूममधील धक्कादायक प्रकार

By

Published : Aug 11, 2019, 10:01 AM IST

नागपूर -शहरातील सीताबर्डी भागातील फ्रेंड्स या कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रूममध्ये मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रकार सुरू होता. दोन तरुणींना चेंजिंग रूममध्ये असताना हा प्रकार लक्षात आल्या नंतर त्यांनी लगेचच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दुकान मालक किसन अग्रवाल आणि नोकर निखिल चौथमल या दोघांना अटक केली आहे.

महिला चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा, नागपूरच्या फ्रेंड्स शोरूममधील धक्कादायक प्रकार

नागपूरमध्ये चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या दुकान मालक आणि नोकरास अटक

दोन शाळकरी विद्यार्थिनी गणवेश विकत घेण्यासाठी नागपूर येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी येथील फ्रेंड्स नामक रेडिमेड कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घेतलेला गणवेश ठिक आहे की नाही हे तपासण्यासाठी चेंजिंग रूमचा उपयोग केला. तेव्हा त्यांना चेंजिंग रूममध्ये लपवून ठेवलेला मोबाईल दिसला. त्यावेळी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू होती. यानंतर त्या दोन्ही विद्यार्थिनींनी सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलीस निरीक्षक युगवेंद्र राजपूत यांनी या प्रकरणी सखोल तपास करुन फ्रेंड्स या कपड्याच्या दुकानाचा मालक किसन अग्रवाल आणि नोकर निखिल चौथमल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांनींनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे आहे, ज्यामुळे विकृत वृत्तीच्या दोघांना चांगलीच अद्दल घडली आहे, असे पोलीस निरीक्षक युगवेंद्र राजपूत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details