नागपूर : नीलडोह गावालगत असलेल्या नर्सरीत अज्ञात महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबियांचा शोध सुरू केला आहे. तसेच ती महिला या भागात कोणासोबत आणि कशासाठी आली होती, याचा तपास सुरू करण्यात (Nagpur Murder News) आला आहे.
विहिरीजवळ आढळला महिलेचा मृतदेह : बुधवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नीलडोह या गावालगतच्या नर्सरीत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ एका महिलेचा रक्तबंबाळ मृतदेह लोकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले. तर ती महिला त्या भागातील नसल्याचे निष्पन्न झाले.
मृत महिला एकासोबत भांडताना दिसली : मृत महिलेचे वय ३५ वर्ष असल्याचा अंदाज आहे. संध्याकाळी ती महिला एका व्यक्तीसोबत भांडण करत असल्याचे काही लोकांनी पाहिले होते. त्याआधारे एमआयडीसी पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तसेच अज्ञात महिलेची ओळख पटवण्याकरिता एमआयडीसी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी निलडोह, राजीव नगर, हिंगणा, वाडी आणि आजूबाजूच्या परिसरातून ३५ ते ४० वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता तर झाली आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
दोन दिवसात तीन हत्या : ऑगस्ट महिन्याची सुरुवात होऊन अवघे दोनच दिवस झाले असताना, नागपूरमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघांची हत्या झाली आहे. उधारी पैशाच्या वादातून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुषार इंगळे नामक तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर काल पाचपावली परिसरात लव ट्रँगलमधून अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर नामक तरुणाची हत्या झाली होती. तर आता एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या निलडोह येथे एका अज्ञात महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात नागपूर शहरात ७ हत्येच्या घटना घडल्या होत्या, ते बघता यावर्षी त्यापेक्षा अधिक आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा -
- Crime News : 3 हजार रुपयांसाठी तरुणाची चाकूने भोसकून हत्या, पाहा धक्कादायक व्हिडिओ
- Nagpur Crime : धक्कादायक! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या
- Nagpur Crime News: बेपत्ता झालेल्या 'त्या' दोघांच्या खूनाचे गूढ उकलले; नदी पात्रात सापडला एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह