नागपूर- यंदा पाऊस न पडल्याने शहरात तसेच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे महापालिकेच्या जलप्रदाय समितीने शहरात कृत्रीम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयाला अर्ज पाठवण्यात आला आहे.
नागपुरात पाणीबाणी; महापालिका कृत्रीम पाऊस पाडणार - पाणीटंचाई
राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही नागपूरसह विदर्भात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे कोरडी पडलेली आहेत. धरणांमध्ये मृत पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही नागपूरसह विदर्भात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे कोरडी पडलेली आहेत. धरणांमध्ये मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी कपातीचा निर्यण महापालिकेला घ्यावा लागला आहे.
पाऊस पुन्हा लांबणीवर गेल्यास शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे आज नागपूर महापालिकेच्या जलप्रदाय समितीने कृत्रीम पाऊस पाडण्याचा महत्वपूर्ण निर्यण घेतला आहे. त्यासाठी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.