नागपूर :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगर पालिकेच्या शाळांनी झेप घेतली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मनपाच्या शाळांचा निकाल ३५ टक्क्यांनी वाढला असून यंदाचा निकाल ८५.२८ टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या तीन शाळांनी शंभर टक्के निकाल देत मनपा शाळाही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. याशिवाय १२ शाळांनी ९० टक्क्यांच्या वर निकाल देण्याची कामगिरी बजावली आहे. विशेष प्रयत्नामुळे आणि देण्यात आलेल्या विशेष कोचिंगचे हे फलित आहे.
नागपूर : दहावीत मनपाच्या शाळांचा ८५.२८ टक्के निकाल तर, तीन शाळांचा १०० टक्के निकाल - ssc exams result 2020 nagpur news
मागील वर्षीच्या तुलनेत मनपाच्या शाळांचा निकाल ३५ टक्क्यांनी वाढला असून यंदाचा निकाल ८५.२८ टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या तीन शाळांनी शंभर टक्के निकाल देत मनपा शाळाही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. याशिवाय १२ शाळांनी ९० टक्क्यांच्या वर निकाल देण्याची कामगिरी बजावली आहे.
शहरातील दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी जयंता अलोणे याने ९४.६ गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर, दत्तात्रयनगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा समीर जांभुळकर हा ९३.८ टक्क्यांसह द्वितीय तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेला आहे. शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी भारती नगरारे आणि दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी संतोष गिरी या दोघांनीही ९०.८ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. मराठी शाळांची एकूण टक्केवारी 92.25 टक्के आहे. इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ९०.६ टक्क्यांसह अंशारा मुनिबा या विद्यार्थिनीने प्रथम, ८३.६ टक्के गुणांसह तस्मीया कौसर ने द्वितीय व ७६.८ टक्के गुण प्राप्त करून मोहम्मद मन्सुरी याने तिसरा क्रमांक पटकाविण्याचे कामगिरी केली आहे. इंग्रजी शाळांची एकूण टक्केवारी 66.66 टक्के आहे.
हिंदी माध्यमातून मनपाच्या सरस्वती तिवारी माध्यमिक शाळेच्या तृप्ती दुबे या विद्यार्थिनीने ८९.६ गुणांसह पहिला, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेच्या मिहिर कोकर्डेने ८५ टक्क्यांसह दुसरा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेच्या पिंकी शुक्ला या विद्यार्थिनीने ८४.६ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. हिंदी शाळांची एकूण टक्केवारी 80.97 टक्के आहे. उर्दू माध्यमातून एम.के.आझाद माध्यमिक शाळेची निशा नाज सादीक ९४ टक्के गुणांसह पहिली आली. तर याच शाळेची आलीया बानो सादीक ने ९०.८ टक्के गुण पटकावून दुसरा क्रमांक पटकाविला आणि ८९.२ टक्के गुण मिळवून फिरदोस परवीन नूर तिसरी आली. उर्दू शाळांची एकूण टक्केवारी 92.73 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून डॉ. आंबेडकर मराठी माध्यम शाळेचे विद्यार्थी चेतन काकडे व शिवराज सावळे यांनी ७६.२ टक्के गुण घेउन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. म.न.पा.शाळेतील १२१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये आणि ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे.