नागपूर : सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तींवर मनापाद्वारे २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने ( Bombay High Court, Nagpur Bench )हा आदेस दिला होता. दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता नागपूरकरांनी नागपूर महानगरपालिकेस ( Nagpur Municipal Corporation ) सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी ( Additional Commissioner Ram Joshi ) यांनी केले आहे.
मोकाट कुत्र्यांना प्रथम दत्तक घ्या - नागपूर यांनी शहर व लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती/रहिवाशी मोकाट/भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट/भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये, जर कोणी व्यक्ती मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल, त्यांनी त्या मोकाट/भटक्या कुत्र्यांना प्रथम दत्तक घ्यावे. त्यांना घरी आणून, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना डॉग शेल्टर मध्ये ठेवावे. त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करावे, यासह त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी, असे आदेश महापालिकेने पारित केले आहे.
२०० रुपयांचा दंड निश्चित -नागपूर महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करुन सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळुन आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारून वसूल करण्यात येईल, असा आदेश नागरिकांना निर्देशित केले आहे.
महापालिकेच्या पथकाला अडथळा घालू नका - मोकाट/भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या पथकाला कुणीही व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्यास संबंधीत विरुध्द प्रचलित कायदेयान्वये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. तरी शहरातील त्रासदायक मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) पाठवावी व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता मनपाचे सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी ( Additional Commissioner Ram Joshi ) यांनी नागरिकांना केले आहे.
मोकाट कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यास 200 रूपयांचा दंड नागपूर महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.
न्यायालयाचे निर्देश - नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले आहे. कुत्र्यांचा हैदोस थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता विजय तालेवार आणि मनोज शाक्य यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.20 ऑक्टोबर रोजी या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मनपाला निर्देश दिले होते. भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिला होते. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. आयते खायला मिळत असल्याने अनेक ठिकाणी कुत्र्यांचे टोळके तयार झाले आहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ले करत असल्याचा घटना वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा न्यायालयाने नोंदवले आहे. एवढंचं नाही तर भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली होती.