नागपूर- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयाच्या दारावर शुभेच्छा फलक लावले होते. मात्र, मुंडे यांना हे फलक दिसून येताच त्यांनी हे नियमांचा भंग असून सुरक्षा रक्षकांना ते फलक लगेच काढण्याची सूचना केली. त्यांनतर ते फलक तिथून लगेच काढण्यात आले.
कार्यालयाच्या गेटवर शुभेच्छा फलक लावल्याचे बघताच तुकाराम मुंढेंनी केले 'हे' - तुकाराम मुंढे नागपूर
फलक महापालिकेची सुरक्षा व्यवस्था भेदून कार्यालयाच्या दारापर्यंत गेलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समस्त नागपूरवासियांकडून तुकाराम मुंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशा आशयाचे हे फलक होते. विशेष म्हणजे, महापालिका सार्वजनिक ठिकाणी अशा बेकायदेशीर फलकांवर कारवाई करते, मात्र काही महाभागांनी थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारावर हे फलक लावून कायदा मोडल्याचे बघायला मिळाले. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे हे फलक महापालिकेची सुरक्षा व्यवस्था भेदून तिथपर्यंत गेलेच कसे, असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. आता नियम पाळण्याचा आग्रह धरणारे तुकाराम मुंढे यासंदर्भात कोणावर कारवाई करतात की नाही हे पाहण्यासारखे असणार आहे.