नागपूर - महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील भांडेवाडी कचरा डेपोतील अनियमितता तपासण्यासाठी छापा टाकला आहे. नागपुरात कचरा संकलनात होत असलेल्या अनियमिततेची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी ही धडक कारवाई केली आहे. कचरा मोजणीत अनियमितता होत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आयुक्त मुंढे यांची नागपुरात धडक कारवाई सुरू आहे.
नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेची डम्पिंग यार्डवर धडक कारवाई - नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील भांडेवाडी कचरा डेपोतील अनियमितता तपासण्यासाठी छापा टाकला आहे. नागपुरात कचरा संकलनात होत असलेल्या अनियमिततेची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी ही धडक कारवाई केली आहे.
हेही वाचा -
कुत्रे पाळणाऱ्या शौकिनांसाठी नवा कायदा, एका घरात पाळता येणार दोनच कुत्रे
कचरा संकलनात होत असलेल्या अनियमिततेची पाहणी करण्यासाठी आयुक्त मंढे आले होते. यावेळी कचरा मोजणीतही अनियमितता होत असल्याची माहिती पुढे आली आहे. सकाळी अचानक मुंढे हे डम्पिंग यार्ड परिसरात पोहोचताच अधिकारी वर्ग सक्रिय झाला. मुंढेंनी कचरा विल्हेवाट लावण्याच्या कार्य पद्धतीची यावेळी माहिती करून घेतली. त्यांनी यार्ड परिसरात सिंगल यूज प्लास्टिकच्या मोहीमचे बारा वाजले असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच एका महिन्यात सिंगल यूज प्लास्टिकच्या मोहिमेवर अंमलबजावणी करा अन्यथा कारवाईला तयार रहा, असे खडे बोल अधिकाऱ्यांना सुनावले. मनपा आयुक्त मुंढे यांचे नागपूरात धडक कारवाईचे सत्र सुरु असून अधिकाऱ्यांमध्ये धास्ती आहे.