महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिकेची ८३६ व्यावसायिकांवर कारवाई; थकीत एलबीटी कर न भरल्याने बँक खाते सील - nmc nagpur lbt bussinessman tax

एलबीटी जमा न केल्याने नागपूर महानगर पालिकेने शहरातील 836 व्यावसायिकांचे बँक खाते सील केले आहे. या व्यावसायिकांवर एलबीटी कराचे 102 कोटी थकीत होते.

nagpur
नागपूर महानगर पालिका

By

Published : Dec 28, 2019, 6:41 AM IST

नागपूर- एलबीटी जमा न केल्याने नागपूर महानगर पालिकेने शहरातील 836 व्यावसायिकांचे बँक खाते सील केले आहे. या व्यावसायिकांवर एलबीटी कराचे 102 कोटी थकीत होते. वारंवार नोटीस बजावून देखील व्यावसायिकांनी कर भरला नाही म्हणून नागपूर महानगर पालिकेकडून सदर कारवाई करण्यात आली.

संदीप जोशी

नागपूर महानगर पालिकेने २०१३ पासून जकात कर बंद करून एलबीटी सुरू केली होती. नियमाप्रमाणे व्यावसायिकांना मनपाच्या स्थानिक कर संस्थेकडे नोंदणी करून एलबीटी जमा करणे अपेक्षित होते. दरम्यान, या काळात जीएसटी लागू करण्यात आले. त्यामुळे एलबीटी रद्द करण्यात आला आणि व्यावसायिकांनी थकीत एलबीटी भरले नाही. व्यावसायिकांवर एलबीटी कराचे १०२ कोटी थकीत होते. याप्रकरणी महापालिकेने व्यावसायिकांना वारंवार नोटीस बजावल्या. मात्र, व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिकांचे खाते सील केले. आता मनपाच्या या कारवाईने थकबाकीदार व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत.

हही वाचा-नागपूर: महापौरांच्या आवाहनाकडे भाजप नगरसेवकांचा काणा डोळा

ABOUT THE AUTHOR

...view details