नागपूर -शहरातील ६ विधानसभा मतदारसंघात महानगर पालिका इंग्रजी शाळा सुरू करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. आज मनपाच्या सभेत हा निर्णय पारित करण्यात आला.
मनपाच्या मराठी शाळांकडे दिवसेंदिवस पालकांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे इंग्रजी शाळांकडे त्यांचा कल वाढत चालला आहे. मनपाची जी. एम. बनातवाला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पटसंख्या दरवर्षी वाढत आहे. म्हणून पालकांचा कल लक्षात घेता शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासन अनुदान देत नाही. अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, चॅरिटी आणि मनपाच्या निधीतून इंग्रजी शाळेतील शिक्षकांना वेतन देण्यात येईल, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.