नागपूर- नागपुरातील लोकमान्य नगर ते सुभाष नगरचा मेट्रोच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला आहे. दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यावर त्याचा ट्रायल रन आयोजित करण्यात आला होता.
नागपूरची 'माझी मेट्रो'ची धाव वाढली; महत्वपूर्ण तिसऱ्या टप्प्यावर ट्रायल रन
संपूर्ण जगात ग्रीन मेट्रो म्हणून ओळख असणाऱ्या नागपुरातील माझी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला वेग आलेला आहे. नागपुरातील महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे सीताबर्डी ते हिंगणा या मार्गावरील लोकमान्य नगर ते सुभाष नगरचा मेट्रोच्या कामाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज त्याचा ट्रायल रन आयोजित करण्यात आला.
केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात ग्रीन मेट्रो म्हणून ओळख असणाऱ्या नागपुरातील माझी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला वेग आलेला आहे. नागपुरातील महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे सीताबर्डी ते हिंगणा या मार्गावरील लोकमान्य नगर ते सुभाष नगरचा मेट्रोच्या कामाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज त्याचा ट्रायल रन आयोजित करण्यात आला.
या टप्प्यामध्ये सीआरपीएफ गेट परिसरातील लोकमान्य नगर ते अंबाझरी तलावजवळील सुभाषनगरपर्यंतची ५.५ किलोमीटरची ट्रायल रन करण्यात आली. संपूर्ण काम लवकरच पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या टप्प्यावरील माझी मेट्रो ही सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात येणार आहे.