नागपूर- 'माझी मेट्रो' सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. जास्त प्रवाशांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने महामेट्रोकडून प्रवासी दरात मोठी सवलत देण्यात आली आहे. नवीन दरानुसार केवळ २० रुपयांमध्ये खापरी ते सीताबर्डी असा १३ किलोमीटरचा प्रवास नागपूरकर अनुभवू शकणार आहेत.
मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता महामेट्रोने मोठी सवलत दिलेली आहे. मेट्रो पूर्णपणे सज्ज झाली असून लवकरच प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रवासी दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्धा मार्गावरील रिचवन कॉरिडोर म्हणजेच खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि हिंगणा मार्गावरील रीच ३ कॉरिडोर लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे. या दोनही मार्गावर प्रवाशांना दरात सवलत देण्यात आली आहे.
सुरुवातीला खापरी स्टेशन ते सिताबर्डी स्टेशनपर्यंत तिकीट दर ३० रुपये निर्धारित करण्यात आले होते. मात्र मेट्रो प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि प्रवासी संख्या वाढावी या दृष्टिकोनातून तिकीट दरांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
नागपूर मेट्रोचे तिकीट दर खालील प्रमाणे आहेत