नागपूर- मेट्रोच्या विकास प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. वृक्षतोड होऊ नये या उद्देशाने २०१५ पासून नागपूर मेट्रोने ३१ मोठी झाडे स्थलांतरीत केली. मात्र, यातील अनेक झाडे वाळली आहेत. मात्र, नागपूर मेट्रोने ही सर्व झाडे जीवंत असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात दिले आहे.
वाळलेली झाडे कागदावर जीवंत; नागपूर मेट्रोचा अजब कारभार - Shahabaz shaikh
वृक्षतोड होऊ नये या उद्देशाने २०१५ पासून नागपूर मेट्रोने ३१ मोठी झाडे स्थलांतरीत केली. मात्र, यातील अनेक झाडे वाळली आहेत.
मेट्रोने कागदावर जीवंत दाखवलेली झाडे प्रत्यक्षात वाळलेल्या अवस्थेत आहेत. २०१५ पासून महामेट्रोने नागपूरमधील किती झाडे स्थलांतरीत केली. तसेच त्या झाडांची सध्याची स्थिती काय या बद्दल पर्यावरण प्रेमी अमित हेडा यांनी आरटीआयमधून विचारणा केली होती.
सर्व झाडे जीवंत असल्याची माहिती मेट्रोने दिली. पण, वास्तविकता काही वेगळीच आहे. ही झाडे केवळ कागदावरच जीवंत आहेत, प्रत्यकक्षात नाहीत. पर्यावरण जागरुकतेचा संदेश देत मेट्रोने सौर ऊर्जेच्या वापराबद्दल सांगितले. मात्र, दुसरीकडे ४० वर्षे जुन्या झाडांच्या संवर्धनाबाबत मेट्रो किती दुर्लक्षित आहे याचे उदाहरण आहे.