नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.
राज्यातील लोकांच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. काही वेळापूर्वीच कुटुंबाशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. याप्रकरणात वेगाने आणि कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे, असेही ते म्हणाले. म्हणून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भिमनवार यांनी केले आहे.