महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Murder Case : हायप्रोफाईल महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांनी न्यायालयात दाखल केली चार्जशीट - Nagpur Police

Nagpur Murder Case : येथील हायप्रोफाईल महिला हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अद्याप पोलिसांना (Nagpur Police) यश मिळालं नाही. नागपूर पोलीस तांत्रिक पद्धतीनं या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेची हत्या होऊन बरेच दिवस उलटलेत. तरीही पोलिसांना या प्रकरणात अद्याप हवं तसं यश मिळालं नाही. पोलिसांनी आता कोर्टात आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे.

Nagpur Murder Case
नागपूर महिला हत्या प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 5:28 PM IST

नागपूरNagpur Murder Case : नागपूरच्या बहुचर्चित महिला हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी साडेतीन महिने उलटून देखील महिलेचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना अपयश आलय. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बिझनेस पार्टनरने महिलेचा खून केलाय. या प्रकरणी प्रमुख आरोपीसह राजेश सिंग, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल यांना पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. पोलिसांनी आता कोर्टात आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. मात्र, मृतदेह सापडला नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.

अद्याप महिलेचा मृतदेह मिळाला नाही : नागपूर येथील महिलेची हत्या झाल्याच्या घटनेला आता मोठा कालावधी लोटला आहे. मध्यप्रदेश जबलपूर येथे महिलेची हत्या झाली तरी या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी केला आहे. महिला हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे नागपूर पोलिसांनी हाती घेतल्यानंतर आरोपी विरोधात भक्कम साक्षी पुरावे गोळा केले. मात्र, अद्याप महिलेचा मृतदेह मिळून आलेला नाही. त्यामुळे आरोपीला न्यायालयातून शिक्षा मिळवून देण्याचं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.



पोलिसांनी गोळा केले भक्कम साक्ष पुरावे: नागपूर पोलिसांच्या एका पथकानं मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे महिला हत्या प्रकरणात साक्षी पुरावे गोळा करण्याचं काम केलं. या पथकानं आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. मध्यप्रदेशच्या जबलपूर मध्ये ज्या राहत्या घरी आरोपीने महिलेची हत्या केली होती. त्या ठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये रक्ताचे डाग पोलिसांना मिळाले होते, ते रक्त या महिलेचं असल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे.


महिलेची साक्ष ठरणार : या शिवाय हत्येच्या दिवशी जेव्हा आरोपीने त्याच्या घरी महिलेचा मृतदेह कार्पेटखाली लपवून ठेवलेला होता. एका महिलेनं कार्पेटच्या आत एका महिलेचे पाय पाहिल्याची अत्यंत महत्वाची साक्ष पोलिसांना दिल्याची माहिती आहे. या शिवाय आरोपीच्या हॉटेलमधील नोकर जितेंद्र गौडने याने आधीच आरोपीच्या गाडीच्या डिक्कीत रक्त पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. त्यामुळं आरोपीने महिलेची हत्या केली यासंदर्भात महत्त्वाचे पुरावे आता पोलिसांचे हाती लागले आहेत.

हेही वाचा -

  1. BJP Woman Leader Murder case : भाजपा महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली
  2. BJP Woman Leader Murder case: भाजपा महिला नेत्या हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांनी गोळा केले भक्कम 'पुरावे'
  3. Nagpur Murder Case : हत्येचं कोडं सोडवण्यासाठी नागपूर पोलीस घेणार गुगलची मदत, आरोपी करत आहे 'दिशाभूल'

ABOUT THE AUTHOR

...view details