नागपूर - नागपूरमध्ये रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याचे समोर आले आहे. ही घसरण 2.2 टक्क्यांवर आली आहे. तसेच, रिकव्हरी रेंट हा वाढवून 97.37 वर पोहचला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या बाधितांच्या तुलनेत कमी असल्याने, सक्रिय रुग्णसंख्या घसरून साडेतीन हजारच्या घरात होऊन पोहचाला आहे. यामुळे सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार पहिल्या लेव्हलमध्ये असल्याने, अनेक निर्बध हटले आहेत. तसेच, आवश्यक आणि आत्यावशक दुकानांना दुपारी पाच वाजेपर्यंत खुले करण्यात आले आहे.
संशयितांची कोरोना चाचणी
नागपूर जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात 8 हजार 778 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 196 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 144 तर ग्रामीण भागातील केवळ 48 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच, 10 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 4, तर ग्रामीण भागात 2, तर जिल्हाबाहेरील 4 जण दगावले आहे. तेच 941 जणांपैकी शहरात 269 तर ग्रामीण 672 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 1464 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून, 2 हजार 076 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.