नागपूर - नागपुरात दररोज पाच हजराच्या घरात मिळणारी कोरोना बाधितांची रुग्ण संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात असली तरी चिंताजनक आहे. ( Nagpur Corona Update ) त्यामुळे रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, शाळा सुरू करण्यासंदर्भात 26जानेवारी नंतरच पुढील निर्णय घेऊ, असे पालकमंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut On School Reopening ) यांनी सांगितले. नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात ( Corona Review Meeting Nagpur ) अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री नितिन राऊत सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात -
सोमवारी कोरोनाच्या नियमावली संदर्भात बैठक व्यापारी वर्गाशी बैठक घेऊन चर्चा करणार आहे. व्यापाऱ्यांचे किंवा लोकांचे नुकसान होईल, असे कुठलेही निर्बंध सध्या शहरात लावले जाणार नाही. ऑक्सिजन बेड तसेच इतर आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मात्र, मास्क न घालणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे.
हेही वाचा -Vaccination New Rule : कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणार लसीकरणासह बुस्टर डोस, केंद्राचे राज्यांना निर्देश
रुग्णसंख्या विक्रम गाठेल -
नागपूर शहरातील ज्या झोनमध्ये सर्वाधिक कोरोनाबधितांची संख्या आहे तसेच मास्क न लावणाऱ्या लोकांची टक्केवारी माहिती करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्या त्या भागातील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. जानेवारी महिन्यात नागपूर शहरात कोरोनाची रुग्णसंख्या संख्या उच्चाक गाठणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात ही संख्या हळूहळू खाली येईल, असाही अंदाज टास्क फोर्सने अंदाज व्यक्त केल्याचे सांगितले. मात्र, रुग्णसंख्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली यार नक्कीच निर्बंध लावले जातील, असेही पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सध्या 17000 बेड असून शाळा सुरू करण्यासंदर्भात 26 जानेवारी नंतर निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आकडा विक्रमी वाटचाल करत असल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही. 26 जानेवारी नंतर पुढील अंदाज घेऊन शाळेसंदर्भात निर्णय घेऊ. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासन घेईल. मात्र, मुलांच्या लिखाण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री नितीन राऊत यावेळी म्हणाले.