नागपूर -बहुचर्चित विधानपरिषद पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यातील सर्वच जिल्ह्यात पार पडली. यात नागपूर विभागाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकीत नागपूर विभागात एकूण ६४.३८ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. यात विभागातून सर्वाधिक ७२.५६ टक्के मतदान भंडारा जिल्ह्यात झाले आहे. तर, सर्वात कमी ६०.८८ टक्के मतदान नागपूर जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे, यंदाची मतदानाची आकडेवारी उमेदवारांच्या मनात धडकी भरवणारी ठरली आहे.
नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी मतदान
निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. विभागातील एकूण १९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर विभागात एकूण २ लाख ६ हजार ४५४ इतकी अधिकृत मतदारांची संख्या आहे. यापैकी सर्वाधिक मतदारांची संख्या ही नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु, जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात कमी मतदान हे नागपूर जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात ६०.८८ टक्के इतके मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत होती. काँग्रेसकडून अभिजित वंजारी, तर भाजपकडून संदीप जोशी हे उमेदवार होते. अशावेळी मतदानाची टक्केवारी कमी आल्याने नक्की कोणाचा विजय होणार? हे सध्या तरी अस्पष्ट आहे.
भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान