महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'त्या' नराधमाला तिथेच पेटवा; पीडितेच्या मृत्यूनंतर वडिलांची मागणी - Give same punishment to accused

पीडितेच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांनी अजूनही आमच्यासोबत संपर्क साधला नाही. या घटनेमुळे आमच्या कुटुंबाची हानी झाली आहे. म्हणून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आम्हाला आरोपीला शिक्षा करण्यासंदर्भात ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या वडिलांनी घेतली.

victmis father
पीडितेचे वडील

By

Published : Feb 10, 2020, 10:18 AM IST

नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेची प्राणज्योत अखेर आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मालवली. हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. मात्र, आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

'त्या' नराधमाला तिथेच पेटवा, पीडितेच्या मृत्यूनंतर वडिलांची मागणी
पीडितेला जो त्रास झाला आहे, ज्या वेदना तिने सहन केल्या त्याच वेदना त्या नराधमाला देण्यात यावा, त्यालासुद्धा त्याठिकाणी पेटवा, अशी मागणी पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केली आहे.

तर पीडितेच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांनी अजूनही आमच्यासोबत संपर्क साधला नाही. या घटनेमुळे आमची कुटुंबाची हानी झाली आहे. म्हणून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आम्हाला आरोपीला शिक्षा करण्यासंदर्भात ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : सोमवारी सकाळीच पेट्रोल हल्ला अन् मृत्यूही सोमवारीच

दरम्यान, 3 फेब्रुवारीला जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज (सोमवारी) आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेचा सर्व स्तरांरून निषेध करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details