नागपूर - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणुन संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज नागपुरातील कस्तुरचंद डागा मैदानावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण संपन्न झाले.
महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण; दुष्काळावर मात करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन - palak mantri
नागपुरातील कस्तुरचंद डागा मैदानावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी संचलनासाठी उपस्थित पथकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात विशेषतः नागपूर जिल्ह्यात दुष्काळाच्या पाश्वभूमीवर अधिकाऱयांनी अधिक जोमाने आणि योग्य नियोजन करून दुष्काळावर मात करावी, असे आवाहन केले. महाराष्ट्राला पुन्हा एकदा मजबूत करून देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनी विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाकरिता विदर्भाचे ध्वजारोहन केले.