नागपूर- विघ्नहर्ता गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडका बाप्पा वर्षभराकरिता भक्तांचा निरोप घेत असल्याने भक्तांनीदेखील बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केल्याचं चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे.
समाजातील दुःख घेऊन जा, नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे - विसर्जन मिरवणुक
नागपुरातील महिलांनी बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याच्याकडे साकडं घातले आहे. समाजातील दुःख घेऊन जा आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहू दे, अशी प्रार्थना या महिलांनी केली आहे.
नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे
विशेषतः नागपुरातील महिलांनी बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याच्याकडे साकडं घातले आहे. समाजातील दुःख घेऊन जा आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहू दे, अशी प्रार्थना या महिलांनी केली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दंग झालेल्या या महिलांशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनीधी धनंजय टिपले यांनी.