नागपूर - नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण नऊ विभागांपैकी नागपूर विभागाची टक्केवारी यंदाही खालावली आहे. तर, यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे.
दहावीच्या निकालातही नागपूर विभागाची टक्केवारी इतर विभागांपेक्षा कमी कोकण विभागाची टक्केवारी ८८.३८ आहे. तर नागपूर विभागाची टक्केवारी ६७.२७% आहे. बारावीच्या निकालातही नागपूर विभागाची टक्केवारी कमी होती. आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्येही नागपूर विभागाची टक्केवारी कमी झाल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळासह संपूर्ण राज्यात दिनांक १ मार्च ते २४ मार्च २०१९ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६५ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती तर, १६ लाख १८ हजार ६०२ प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण राज्याच्या निकालाची टक्केवारी ही ७७.१०% आहे.
नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर व गडचिरोली या ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. ६९० केंद्रावर ही परीक्षा घेतल्या गेली. यामध्ये १ लाख ६४ हजार ७५१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ६२ हजार ५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी १ लाख ८ हजार ९७७ विद्यार्थी पास झाले.