महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rainfall In Nagpur: नागपूर विभागात सरासरी 45.8 मिमी पाऊस, विभागातील 12 तालुक्यांत अतिवृष्टी - Heavy Rain In Nagpur Region

सध्या राज्यभरातच जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पुर परिस्थिती आहे. दरम्यान, या पुरपरिस्थितीमुळे अनेक ठिकाणी लोकांचे प्राणही गेले आहेत. ( Heavy Rain In Nagpur Region ) गेल्या 24 तासांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सरासरी 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात सरासरी 45.8 मिमी पाऊस
नागपूर विभागात सरासरी 45.8 मिमी पाऊस

By

Published : Jul 15, 2022, 3:00 PM IST

नागपूर - नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूर विभागात 12 तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ( Warning to The Villages In Nagpur District ) नदीकाठा वरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

१२ तालुक्यात झालेला पाऊस (एम.एम मध्ये) - जिल्हानिहाय अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे 122.9 (मीमी), नागपूर ग्रामीण 101.1, उमरेड 94.5, कुही 88.5, नागपूर शहर 82.7, पारशिवनी 65.1, कामठी 64.3 मिमी., भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे 83, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया येथे 81.3, मोरगांव अर्जुनी तालुक्यात 81 मिमी., गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात 78.3 तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात 70.7 मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी - नागपूर विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय सरासरी पावसाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे. नागपूर 72.5 (530.6), गोंदिया 52.8 (555.5), भंडारा 42 (492.1), चंद्रपूर 38.6 (645.1), वर्धा 34.6 (513) आणि गडचिरोली 18.2 (532.4) पाऊस झाला आहे. नागपूर विभागात दि.1 जून ते 15 जुलैपर्यंत सरासरी 545.8 मि. मी. पाऊस पडला आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट; शर्मिला ठाकरेंकडून औक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details