महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर उपजिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, संपर्कातील अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन - नागपूर उपजिल्हाधिकारी यांना कोरोना बातमी

संपूर्ण जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटर वर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे नागपूरचे उपजिल्हाधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली आहे. यानंतर, संपूर्ण कार्यालय सील करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

  उपजिल्हाधिकारी यांना कोरोनाची लागण
उपजिल्हाधिकारी यांना कोरोनाची लागण

By

Published : Jul 17, 2020, 8:47 PM IST

नागपूर :जिल्ह्यात कोरोनाचा सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच संपूर्ण जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरवर नियंत्रण ठेवणारे नागपूरचे उपजिल्हाधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी यांचे दालन असलेला परिसर सील करण्यात आला आहे. सोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे नागपूरचे उपजिल्हाधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. उपजिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांचे दालन सील करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोबतच या अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरच कोरोना चाचणी होणार असल्याचेही पुढे येत आहे.

नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्यावर क्वारंटाईन सेंटर्सवर लक्ष ठेवणे, सोबतच बाहेरुन विमानाने येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या नावांची यादी तयार करणे, त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्याची जबाबदारी आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या स्पष्ट नसली तरी त्यांचे कार्यालयीन सहकारी असलेले १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details