नागपूर -गुन्हे शाखा पोलिसांची तब्बल एकाच वेळी ८६ ठिकाणी छापेमारी करून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांच्या या धकडेबाज कारवाईमुळे अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीच्या अवैध धंद्यात लिप्त आरोपींचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईत 22 जणांना अटकही करण्यात आली आहे.
उपराजधानी नागपूर शहरात अमली पदार्थ तस्कर आणि विक्रेते आपले जाळे वेगात पसरत असल्याने तरुणी नशेच्या आहारी जात आहे. लॉकडाऊन दरम्यान अमली पदार्थ तस्करांचा धंदा तेजीत असल्याचे निदर्शनात येताच नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करत अवघ्या सात तासात ८६ ठिकाणी छापेमारी केली आहे. प्राथमिक माहिती नुसार या कारवाईत १३ लाखांची एमडी ड्रग्स, ७.८ लाखांचा चरस आणि अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर 20 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या धकडेबाज कारवाईमुळे शहरातील ड्रग तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.