नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आज नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने फडणवीसांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा; फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर हेही वाचा -'26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशीची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा'
निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी, नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्हे लपवल्याचा आरोप नागपुरातील वकील सतीश उके यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनावणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी 3 वेळा फडणवीस यांना न्यायालयात व्यक्तिगत उपस्थित राहण्यापासून विविध कारणास्तव न्यायालयाने सूट दिली होती. तरिही चौथ्यांदा न्यायालयाने फडणवीस यांना स्वतः उपस्थित राहण्यापासून सूट देत ही शेवटची संधी असल्याचाही उल्लेख केला होता.
हेही वाचा -'33 कोटी वृक्ष लागवडीची वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे, प्रकरणाची चौकशी करा'