नागपूर- कुख्यात डॉन अरुण गवळीच्या पॅरोलला मुदतवाढ देण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला 24 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात याचिका मंजूर केली.
लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्यांदा अरुण गवळीच्या पॅरोलला मुदतवाढ - arun gawali parol
पत्नी गंभीर आजारी असल्याने न्यायालयाने अरुण गवळीला 45 दिवसाचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार 27 एप्रिलला त्याला आत्मसमर्पण करायचे होते, मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता.
![लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्यांदा अरुण गवळीच्या पॅरोलला मुदतवाढ nagpur-court-aproved-extention-to-arun-gawalis-parol](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7125859-thumbnail-3x2-mum.jpg)
पत्नी गंभीर आजारी असल्याने न्यायालयाने अरुण गवळीला 45 दिवसाचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार 27 एप्रिलला त्याला आत्मसमर्पण करायचे होते, मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता, तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. आता गवळी यांना 24 मे ला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.
दरम्यान, अरुण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाहसोहळा शुक्रवारी पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिताचे लग्न झाले.