नागपूर -राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे. आज संपूर्ण दिवसभरात १७०३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल' झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरातील रुग्ण संख्या दर दिवसाला हजार ते दीड हजाराने वाढत असताना आज पहिल्यांदाच रुग्ण संख्येने सातराशेचा आकडा पार केला. त्यामुळे नागपुरातील एकूण रुग्णांची संख्या ३२,७०५ इतकी झाली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात आढळले १७०३ नवीन रुग्ण - नागपूर कोरोना लेटेस्ट न्यूज
आज पॉझिटिव्ह आलेल्या १७०३ रुग्णांपैकी २२१ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १४७४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १०५९ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या १७०३ रुग्णांपैकी २२१ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १४७४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १०५९ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१,६५६ इतकी झाली आहे. या शिवाय आज ४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नागपूरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ११३२ इतका झाला आहे.
महत्वाचे म्हणजे ११३२ पैकी ८५९ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत तर १६३ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील ४० ठिकाणी ९९१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी ५७९८ रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६६.२२ टक्के इतके आहे.