नागपूर- दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
#Coronavirus : चिंता वाढली..! नागपूरात कोरोना बाधितांचा आकडा 11 वर
दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 18 व्यक्तींची शुक्रवारी तपासणी केली होती. त्यातील 17 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह तर एकाचा पॉझिटिव्ह आला. यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
नागपुरात आणखी एका कोरोना रुग्णाची भर
दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 18 व्यक्तींची शुक्रवारी तपासणी केली होती. त्यातील 17 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नागपूरात आता कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
गुरुवारी दिल्ली येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
Last Updated : Mar 28, 2020, 11:36 AM IST