नागपूर : ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकलेल्या एका व्यापाऱ्याने ५८ कोटी रुपये गमावले होते. त्यानंतर उघड झालेल्या या गोरखधंद्याचा (Bookie Anant alias Sontu Jain) मास्टरमाइंड अनंत उर्फ सोंटू जैनच्या गोंदिया येथील निवासस्थानी पोलिसांनी केलेल्या कारवाईत (Online Game Cheating Case Nagpur) १६ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड, १२ किलो सोन्याचे बिस्कीट व २९४ किलो (Businessman Online Game Cheating) चांदी जप्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा साडेचार कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. आरोपी अनंत उर्फ सोंटू जैनच्या लॉकरमधून साडेचार कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत ३१ कोटी रुपये इतकी झाली आहे.
बुकीच्या घरावर धाड : गेल्या महिन्यात २१ जुलैला तक्रादाराने तक्रार केल्यानंतर ऑनलाइन गेमचा गोरखधंदा किती मोठा असेल याचा खुलासा झाला होता. जेव्हा नागपूरच्या व्यापाऱ्याने ऑनलाइन गेमच्या नादात अडकून ५८ कोटी रुपये गमावले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकाने गोंदिया येथे राहत असलेल्या आरोपीच्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी पहिल्या दिवशी आरोपी अनंत उर्फ सोंटू जैनच्या घरातून ४ किलो सोने आणि १० कोटीची रोकड जप्त केली होती.
आतापर्यंत ३१ कोटींचा ऐवज जप्त : अनंत उर्फ सोंटू या बुकीने ऑनलाइन गेमिंगचे नेटवर्क तयार केले होते. या माध्यमातून तो मोठ्या व्यापाऱ्यांना जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपये हडप करत होता. फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदियामधील ४ लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ४.५४ कोटी रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने एवढा ऐवज जप्त केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात आरोपीच्या ताब्यातून १६ कोटी ५९ लाख रुपये रोख, 12 किलो सोने व २९४ चांदी जप्त केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३१ कोटीची रोख रक्कम व दागिने जप्त केले आहेत.