पोलीस आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती नियंत्रणात नागपूर Nagpur Blast News- नागपुरातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. सोलर एक्सप्लोसिव्ह बाजारगाव कंपनीच्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण स्फोटात सोलर कंपनीच्या सीबीएच 2 युनिटमध्ये घटना घडली आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटानंतर राज्य सरकारकडून मृताच्या वारसांना ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे.नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
कोळसा खाणीसाठी लागणाऱ्या स्फोटकांचा स्फोट झाला. त्यात अडकलेल्या ९ जणांचा मृत्यू झाला. त्या इमारतीमधून सर्व कामगारांना बाहेर काढले आहे. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी आतमध्ये आहेत. कंपनीच्या व्यस्थापनानं पोलीस आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे-सोलार कंपनीचे जनरल मॅनेजेर आशिष श्रीवास्तव
- कंपनीत स्फोट झाल्यानंतर बाजारगाव येथील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे.
- कोळशा खाणीत वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा स्फोट झाला आहे. स्फोटकांचं पॅकेजिंग करत असताना ही दुर्घटना घडल्याचं सूत्रानं सांगितलं.
- सोलार ग्रुपच्या वेबसाईटवरील माहितीनुसार सत्यनारायण नंदलाल नुवाल यांनी सोलर ग्रुपची 1995 मध्ये स्थापना केली. ही कंपनी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त औद्योगिक स्फोटक उत्पादनासाठी ओळखली जाते. कंपनीत संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या दारुगोळ्यासाठी एकात्मिक सुविधा आहे. 3 लाख मेट्रिक टन स्फोटकांचे वार्षिक उत्पादन पार करणारी सोलार ग्रुप ही देशातील पहिली कंपनी आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या 20 जिलेटीन कांड्या म्हणजेच 'ईमलशन एक्सप्लोसिव्ह' सापडले होते. ही स्फोटके याच कंपनीकडून निर्मित असल्याची माहिती समोर आली होती.
- 2018 मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.
- जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी कंपनीबाहेर गर्दी केली आहे. कंपनीत किती कामगार काम करत होते, याची माहिती समोर आली नाही. स्फोटाची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढणार असल्यानं कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे.
मृतांमध्ये 6 पुरुष व तीन महिलांचा समावेश-युवराज किशनजी घारोडे, ओमेश्वर किशनलाल मच्छिर्के, मिता प्रमोद उईके, आरती निलकांता सहारे, स्वेताली दामोदर मारबते, पुष्पा श्रीरामजी मानपुरे, भाग्यश्री सुधाकर लोणारे, रुमिता विलास, उईके आणि मोसाम राजकुमार पाटले यांचा मृतामध्ये समावेश आहे. मृतामध्ये वर्धा येथील २, चंद्रपूर येथील एक आणि अमरावती येथील एक जण रहिवाशी आहे. तर पाच जण हे नागपूरमधील रहिवाशी आहेत.
हेही वाचा-
- गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; स्फोटात चार जण गंभीर, हादऱ्यानं 4 ते 5 घरं जमीनदोस्त
- ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनात सिलेंडरचा स्फोट